महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी Amit Shah मुंबईत दाखल; सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस, पवार, शिंदेंच्या भेटीची शक्यता
खातेवाटपाचा तिढा यावर अमित शाह यांच्यासोबत चर्चा होण्याचा अंदाज आहे.
महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा थोड्याच वेळात मुंबईमध्ये आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यापूर्वी आता मुंबई मध्ये अमित शाह दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील आहेत. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार अमित शाह या शपथविधी सोहळ्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेणार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? याचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यातील बोलणी आणि सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाचा सामावेश होऊ शकतो. खातेवाटपाचा तिढा यावर चर्चा होण्याचा अंदाज आहे.
अमित शाह मुंबई मध्ये दाखल
एकनाथ शिंदे अमित शाह यांची भेट होणार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)