पुण्यात वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीला उपमुख्यमंत्री अजित पवारांची तत्त्वत: मंजुरी
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. महाराजांच्या स्मारकाचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचनाही अजित पवारांनी दिल्या आहेत.
पुण्यात वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज (20 डिसेंबर) मंजुरी दिली आहे. महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक उभारण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
अजित पवार यांची माहिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)