Ajit Pawar Video: 'मी थांबविण्याचा प्रयत्न करतोय आणि तू वाजवतोय'; तुतारी वाजवणाऱ्याला अजित पवारांचा टोला

आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुतारी वाजली

Ajit Pawar | X

आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुतारी वाजली आणि अजित पवार यांनी मी थांबविण्याचा प्रयत्न करतोय आणि तू वाजवतोय... असे वक्तव्य करताच उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार हशा पिकला.  अजित पवार यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिले आणि तुतारी हे चिन्ह दिले आहे. अजित पवारांच्या या हजरजबाबीमुळे अनेकांनी त्यांचे कौतृत केले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement