Adult Film Shooting In Lonavala: लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेऊन ॲडल्ट फिल्मचे शूटींग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

विविध राज्यातील तरुण-तरुणी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Arrest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Adult Film Shooting In Lonavala: पुण्यात कधी ड्रग्ज तर कधी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होत असतानाच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेऊन तिथे ‘ॲडल्ट फिल्म’ (Adult Film) बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती आल्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला. इतर राज्यातील 15 तरुणांचा समूह हे ॲडल्ट चित्रपट बनवत असल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी अश्लील डिजिटल सामग्री पुरवणाऱ्यांसाठी तसेच काही अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट फिल्म्सची निर्मिती करत होती. विविध राज्यातील तरुण-तरुणी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लोणावळ्यात पोलिसांनी या व्हिलावर छापा टाकला. त्यानंतर येथे ॲडल्ट व्हिडिओचे शूटिंग सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी शूट केलेले सर्व फुटेज ताब्यात घेतले आहेत. यासोबतच कॅमेरे व इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)