Monkeypox: राजधानी दिल्ली पाठोपाठ केरळमध्ये मंकीपॉक्सचे तीन नवे रुग्ण

केरळमध्ये मंकीपॉक्सचे तीन नवीन रुग्ण आढळले असुन खबरदारी म्हणून या तीनही रुग्णांना 21 दिवसांसाठी क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे.

Monkeypox Virus | (Photo Credits: Wikimedia Commons)

केरळमध्ये (Kerala) मंकीपॉक्सचे (Monkeypox) तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. खबरदारी म्हणून या तीनही रुग्णांना 21 दिवसांसाठी क्वारंटाईन (Quarantine) कक्षात ठेवण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात एकाचं वेळी तीन रुग्ण आढळले असल्यानं समुदायाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी शासकीय वैद्यकीय रुग्णायाचे डॉ अनिष (Dr Anish) यांनी नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन यांनी केले आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) आज सकाळीचं मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे.  देशात आता मंकीपॉक्स रुग्णांची वाढती संख्या बघता देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now