Shree Siddhivinayak Temple Live Darshan: गणेश चतुर्थी दिवशी मुंबईच्या सिद्धिविनायक गणपतीचं इथे घ्या लाईव्ह दर्शन

गणेश चतुर्थीला घर बसल्याही घेऊ शकाल दर्शन

Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

गणेश चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पाच्या भाविकांसाठी वर्षाभरातील सर्वात जास्त जल्लोषाचा दिवस असतो. घराघरात सार्वजनिक मंडळांमध्ये या दिवशी गणरायाची मूर्ती विराजमान होत असते अशामध्ये प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्येही बाप्पाच्या दर्शनासाठी रांग असते. यंदा दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणामध्ये गणरायाचं आगमन होणार असल्याने भाविकांची थेट दर्शनाची गर्दी देखील अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभादेवीच्या सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय आहे.

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)