Narali Purnima Special Recipes: नारळी भात ते नारळाचे आप्पे नारळी पौर्णिमेसाठी बनवा खोबर्‍याचे स्वादिष्ट पदार्थ, पाहा व्हिडीओ

नारळी पौर्णिमा हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेला नारळापासून विशेष प्रकारचे अन्न तयार करून सेवन केले जाते. सर्वजण मिळून जेवणाचा आस्वाद घेतात. नारळापासून बनवलेल्या डिश बघूया, पाहा व्हिडीओ

Narali Purnima (Photo Credits-File Images)

Narali Purnima Special Recipes: नारळी पौर्णिमेचा सण उद्या आहे. नारळी पौर्णिमा हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि कोकण व्यतिरिक्त, हा सण गोवा, गुजरातच्या किनारी भागातही साजरा केला जातो, जेथे कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव वरुण देवाची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात, समुद्रात होणार्‍या अनुचित घटनेपासून वाचव अशी प्रार्थना करतात. नारळी पौर्णिमेला  नारळापासून विशेष प्रकारचे अन्न तयार करून सेवन केले जाते. सर्वजण मिळून जेवणाचा आस्वाद घेतात. यामध्ये प्रामुख्याने नारळी भात, नारळ्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबर्‍याचे लाडू यांचा समावेश असतो.चला तर मग आपणही नारळापासून बनवलेल्या डिश बघूया, पाहा व्हिडीओ [ हे देखील वाचा: Raksha Bandhan Gifts Under 500: रिमोट कंट्रोलर शटर बटण ते लॅपटॉप स्टँड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 500 रुपयांच्या आतील हटके भेटवस्तूंची यादी, पाहा]

पाहा व्हिडीओ : 

नारळाचे लाडू: 

नारळ बर्फी: 

नारळाचा पारंपारिक पदार्थ: 

नारळाचे आप्पे: