Mumbaicha Raja, Ganeshgalli Ganpati Visarjan 2024: गणेशगल्लीचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ; इथे पहा थेट प्रक्षेपण

मुख्य प्रवेशद्वारावर 11.30 वाजता समाजप्रबोधनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Mumbai Cha Raja 2024 | YouTube

Mumbaicha Raja, Ganeshgalli Ganpati Visarjan LIVE Streaming: आज दहा दिवसांच्या सेवेनंतर मुंबई मध्ये गणपतींचं विसर्जन होणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला  घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेले गणपती भक्तांचा निरोप घेतात. लालबाग परळ भागामध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठी धामधूम असते पण आज हा भाग विसर्जनाच्या मिरवणूकांनी गजबजून जाणार आहे. त्यानंतर बाप्पा गिरगाव  चौपाटीवर जाणार आहे. यंदा या गणेशगल्लीच्या गणपतीला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

गणेशगल्लीचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)