Lalbaugcha Raja 2023 Live Darshan: लालबागचा राजा आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुला; घरबसल्या लाईव्ह दर्शन, आरती पहा इथे

दहा दिवसांचं रोज बाप्पाचं विलोभनीय रूप घरबसल्या पहायचं असेल तर लालबागच्या राजाचं लाईव्ह दर्शन उपलब्ध आहे.

लालबागचा राजा 2023

लालबागच्या राजाची आज पहाटे प्राणप्रतिष्ठा पूजा संपन्न झाल्यानंतर बाप्पा भाविकांच्या सेवेमध्ये आला आहे. लालबाग मध्ये चिंचोळ्या गल्लीमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी देशा-परदेशातून भाविक येतात. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. मग दहा दिवसांचं रोज बाप्पाचं विलोभनीय रूप घरबसल्या पहायचं असेल तर लालबागच्या राजाचं लाईव्ह दर्शन उपलब्ध आहे. फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम, युट्युब चॅनेल वर त्याचे अपडेट्स पाहता येतील तसेच लाईव्ह दर्शनही अधिकृत युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे. तेथेच बाप्पाची आरती देखील पाहता येणार आहे.

लालबागचा राजा 2023 लाईव्ह दर्शन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement