Viral Video: रस्त्याच्या मधोमध चालत्या कँटरला लागली भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
मुजफ्फरनगरच्या न्यू मंडी पोलीस स्टेशन परिसरातील जनसठ रोडवर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडतात, अशा अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना मुजफ्फरनगर येथे घडली असून एका ट्रकला अचानक भीषण आग लागली, घटनेचा व्हिडिओ @bstvlive हँडलने शेअर केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की, ट्रक चालक आणि वाहकाला जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारावी लागली. हे आयशर कँटर होते
Viral Video: मुजफ्फरनगरच्या न्यू मंडी पोलीस स्टेशन परिसरातील जनसठ रोडवर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडतात, अशा अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना मुजफ्फरनगर येथे घडली असून एका ट्रकला अचानक भीषण आग लागली, घटनेचा व्हिडिओ @bstvlive हँडलने शेअर केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की, ट्रक चालक आणि वाहकाला जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारावी लागली. हे आयशर कँटर होते, जे रद्दीने भरलेले होते. गाडी पानिपत खटीमा येथे पोहोचताच अचानक आग लागली. यामुळे रस्त्यावर गोंधळ उडाला आणि काही क्षणातच गाडी जळून खाक झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. हेही वाचा: MP Road Accident: मध्य प्रदेशात कार आणि खासगी बसच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 9 जण जखमी
येथे पाहा, घटनेचा व्हायरल व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)