UP: निर्दयी आईने नवजात अर्भकाचा मृतदेह फेकला शेतात, कुत्र्यांनी कुरतडल्यामुळे बाळाचा मृत्यू
आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मात्र उत्तर प्रदेशातील एका जन्मदात्या मातेने असे पाऊल उचलले आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या क्रूर आईने नवजात बाळाला शेतात फेकून दिले. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील मिलक पोलीस स्टेशन हद्दीतील खमरियान गावात त्यावेळी गोंधळ उडाला होता.
UP: जगात आईसारखे दुसरे पवित्र नाते नाही. आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मात्र उत्तर प्रदेशातील एका जन्मदात्या मातेने असे पाऊल उचलले आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या क्रूर आईने नवजात बाळाला शेतात फेकून दिले. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील मिलक पोलीस स्टेशन हद्दीतील खमरियान गावात त्यावेळी गोंधळ उडाला होता. गावकऱ्यांनी शेतात नवजात अर्भकाचा मृतदेह पाहिला. कुत्रे मृतदेह कुरतडत असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्यांचा आवाज ऐकून गावकरी शेतात पोहोचले असता त्यांना हे नवजात अर्भक दिसले. याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. @News1IndiaTweet या हँडलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
नवजात अर्भकाचा मृतदेह फेकला शेतात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)