SUV vs SUV in Gurugram: भररस्त्यात दोन एसयूव्ही एकमेकींशी भिडल्या, थरारक दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी (Watch Video)

गुरुग्राममधील रोड रेजच्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काळ्या रंगाच्या एसयूव्हीने पांढऱ्या एसयूव्हीला दोन ते तिन वेळा धडक दिली.

SUV vs SUV in Gurugram: गुरुग्राममधील रोड रेजच्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बुधवारी, 19 जून रोजी काळ्या रंगाची एसयूव्हीने पांढऱ्या एसयूव्हीला दोन ते तिन वेळा धडक दिली. पांढऱ्या रंगाची एसयूव्ही रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून आलेल्या काळ्या एसयूव्ही (SUV)कार चालकाने तिला धडक देत ढकलले. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेवेळी ती दृश्ये पहायला रस्त्यावर वाहनाची गर्दी झाली होती. त्यानंतर काळ्या एसयूव्ही चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ पाहून सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया उमटवल्या, नेटिझन्सने विनोदीपणे त्याची तुलना "गँग्स ऑफ वासेपूर " मधील दृश्यांशी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now