Sensex Opening Bell: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी मजबूत, सेन्सेक्स 391 अंकांनी वधारला, निफ्टीने 19250 पार

या काळात अदानी पॉवरचे शेअर्स चार टक्क्यांनी तर टाटा मोटर्सचे शेअर्स तीन टक्क्यांनी वाढले.

Stock Market | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Sensex Opening Bell: शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) मजबूती दिसून आली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. सकाळी 09:37 वाजता सेन्सेक्स 371.17 (0.57%) अंकांच्या वाढीसह 64,472.59 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. दुसरीकडे, निफ्टी 119.10 (0.62%) अंकांनी मजबूत झाला आणि 19,253.70 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. या काळात अदानी पॉवरचे शेअर्स चार टक्क्यांनी तर टाटा मोटर्सचे शेअर्स तीन टक्क्यांनी वाढले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)