UP Viral Video: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात शुक्रवारी मोहरमच्या मिरवणुकीत आलम घेऊन जात असताना विजेचा झटका लागल्याने 6 लोक जखमी झाले. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पुरुषांचा एक गट जेव्हा आलम म्हणजे मोठा सजवलेला बांबू त्यांच्या वर असलेल्या इलेक्ट्रिक केबलच्या संपर्कात आला तेव्हा त्यांना विजेचा मोठा झटका बसला आहे. पावसात भिजल्यामुळे त्यांना विजेचा झटका बसला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. पोलिसांनी लोकांना सुरक्षिततेने मिरवणूक काढण्याचे आवाहन केले आहे.
#मोहर्रम में हादसा 😢#UP के संभल ज़िले में #मोहर्रम के जुलूस में निकाले जा रहे #अलम में करंट उतरने से आधा दर्जन लोग घायल हो गये, बारिश के चलते भीगने से अलम रेलवे ट्रैक पार करते वक्त बिजली के संपर्क में आ गया था। pic.twitter.com/N8Uq0GWxKA
— Fasihi (@klmfasihi) July 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)