Bengaluru Shocker : अजान दरम्यान मोठ्या आवाजात गाणी लावली, टोळक्याची दुकानदाराला मारहाण; बेंगळुरूमधील घटना (Watch Video)

बेंगळुरूमधील सिद्दण्णा लेआउट भागात अजान दरम्यान मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या रागात एका टोळक्याकडून दुकानदारावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Photo Credit - Twitter

Bengaluru Shocker : अजान (Azaan) दरम्यान मोठ्या आवाजात गाणी लावल्याबद्दल तरुणांच्या एका गटाने बेंगळुरूमध्ये एका दुकानदाराला मारहाण(Shopkeeper Assaulted) केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 5 मिनिटांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये काही तरुण बेंगळुरूच्या सिद्दण्णा लेआउट भागात एका दुकानदारासोबत वाद घालताना दिसत आहेत. त्या वादाच रूपांतर नंतर मारहाणीत होतं. (हेही वाचा : Pune Crime: रोज जेवणाला नावं ठेवतो म्हणून रागाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला, पत्नीवर गुन्हा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now