SBI Q4 Results: स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा 24 टक्क्यांनी वाढला, प्रति शेअर 13.70 रुपये लाभांश केला घोषित

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बँकेने सांगितले की, आर्थिक वर्ष 24 च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत नफ्यात 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीतील नफा 16,694.5 कोटी रुपयांवरून 20,698.3 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

SBI | Twitter

SBI Q4 Results: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बँकेने सांगितले की, आर्थिक वर्ष 24 च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत नफ्यात 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीतील नफा 16,694.5 कोटी रुपयांवरून 20,698.3 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत नफ्यात 24 टक्के वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना खूश करण्यासाठी बँकेने प्रति शेअर 13.70 रुपये लाभांश दिला आहे. बोर्डाने 22 मे 2024 ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे, तर लाभांश 5 जून 2024 रोजी दिला जाईल.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement