West Bengal: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तरूणीवर बलात्कार आणि हत्येच्या अफवांना उधाण; पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा
त्यावर पूर्वा बर्धमान पोलिसांकडून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
West Bengal: किता बौरी नामक तरूणीवर 14 ऑगस्ट रोजी आरजी कार घटनेशी संबंधित मोर्चमध्ये भाग घेतल्यानंतर ती घरी परतत असताना तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. अशा माहितीच्या अफवा पसरल्या गेल्या आहेत. पूर्व बर्दवान पोलिसांनी एक्सवर पोस्ट करत ही वस्तुस्थिती नसल्याचे म्हटले आहे. अंकिता बौरी नावाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या झाल्याची घटना बर्दवानमध्ये घडलेली नाही. तर, अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. पूर्व बर्दवान पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत. असे पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोस्ट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)