Rahul Gandhi on BJP : 'ही निवडणूक लोकशाही आणि देशाची राज्यघटना नष्ट करू पाहणाऱ्या शक्ती विरोधी लढाई'- राहूल गांधी
त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
Rahul Gandhi on BJP : उमेदवारी (Nomination )अर्ज दाखल केल्यानंतर राहूल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "ही निवडणूक लोकशाही आणि भारतीय राज्यघटनेची लढाई आहे. एका बाजूला या देशाची लोकशाही आणि या देशाची राज्यघटना नष्ट करू पाहणाऱ्या शक्ती आहेत. आणि दुसऱ्या बाजूला संरक्षण करणारी शक्ती आहे. एक शक्ती संविधान आणि आपल्या देशाच्या लोकशाही स्वरूपाचे रक्षण करत आहे. त्यामुळे कोण कोणत्या बाजूला आहे? हे तुम्हा सर्वांना स्पष्ट झालं असेल. संविधानावर कोण हल्ला करत आहे? या देशाच्या लोकशाही रचनेवर कोण हल्ला करत आहे? हे अगदी स्पष्ट आहे.", असे राहूल गांधी (Rahul Gandhi) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. (हेही वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे वायनाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन, उमेदवारी अर्ज केला दाखल ( Watch VIDEO ))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)