PM Narendra Modi's speech in Lok Sabha : 'जुन्या संसदेतून बाहेर पडण्याचा हा क्षण भावनिक' - PM Narendta Modi

आज खासदारांचा जुन्या संसद इमारतीमधील शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नव्या इमारतीमधून कामकाजाला सुरूवात होणार आहे.

PM Modi In LS | PC: X/ANI

आज 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबर पर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. आज जुन्या संसदेला निरोप देत खासदार 19 सप्टेंबर दिवशी संसदेच्या नव्या इमारती मध्ये कामाला सुरूवात करणार आहे. आज लोकसभेमध्ये कामाला सुरूवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहाला संबोधत देशाच्या मागील 75 वर्षांच्या  आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी जुन्या इमारतीचा निरोप घेणं हा भावनिक करणारा क्षण असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सभागृहाच्या अध्यक्षांपासून स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणार्‍यांपासून ते संसदेच्या पत्रकारांपासून अगदी संसदेवरील हल्ल्याच्या वेळेस गोळ्या झेललेल्या जवानांना नमन केलं आहे.

पहा नरेंद्र मोदी यांचे संसदेमधील भाषण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now