Nana Patole: शिंदे सरकार हे डाका मारुण आणलेलं सरकार, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघात
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला असुन या समन्सनुसार सोनिया गांधींना 26 जुलै म्हणजे आज ईडी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचं पार्श्वभुमिवर काँग्रेस (Congress) जोरदार आक्रमक झाली असून देशभरात कॉंग्रेसकडून निदर्शन करण्यात आली. आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत देखील कॉंग्रेसकडू आंदोलन करण्यात आलं. दरम्यान नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. शिंदे सरकार हे डाका मारुण आणलेलं सरकार, चोरी करुन आणलेलं सरकार आहे म्हणून सरकार स्थापन होवू महिना होण्यावर आला तरी मंत्रीमंडळ स्थापन करु शकले नाही अशी टीका नाना पटोलेंनी शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.
लोकशाहीचे हनन करून वर्तमान राज्य सरकार सत्तेत आले आहे.#Maharashtra#ED#Congress pic.twitter.com/DvXJG86Tb0
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 26, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 26, 2022 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

