PM Modi in Varanasi: विजयानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा काशी विश्वनाथ धामला पोहोचले, विधीपूर्वक केली भगवान भोलेनाथांची पूजा

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पहिल्यांदाच काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचले. येथे त्यांनी भगवान भोलेनाथांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पहिल्यांदाच काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचले. येथे त्यांनी भगवान भोलेनाथांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली. तत्पूर्वी, मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी दशाश्वमेध घाटावर गंगेची पूजा केली आणि गंगा आरतीमध्ये भाग घेतला. यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. मंगळवारीच त्यांनी वाराणसीमध्ये किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी केला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now