Ola Electric Scooter Caught Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग, जबलपूर मधील घटना (Watch Video)

मध्य प्रदेशात जबलपूर महामार्गावर ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ola Scooter Fire PC Twitter

Ola Electric Scooter Caught Fire: मध्य प्रदेशात जबलपूर महामार्गावर ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा राहिला आहे. ही घटना अंधमुख बायपास रोडवर मंगळवारच्या पहाटे घडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली.या आगीत स्कूटर संपुर्ण जळाली आहे.  सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now