Video - पॉश भागातील शोरूममधून चोरट्यांनी 3 कोटी रुपयांची ब्रँडेड घड्याळे चोरीला, चोरी सीसीटीव्हीत कैद, गाझियाबादमधील घटना

शोरूम मालकाच्या तक्रारीनुसार चोरट्यांनी सुमारे 671 घड्याळे चोरून नेली. ट्विटरवर @vani_mehrotra या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

गाझियाबादच्या इंद्रपुरम कॉम्प्लेक्समधील पॉश भागातील घड्याळाच्या शोरूममधून चोरट्यांनी सुमारे 3 कोटी रुपयांची ब्रँडेड घड्याळे चोरून नेली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कैद झाले आहे. चोरट्यांनी शटर तोडून शोरूमचे काउंटर व शोकेसच्या काचा फोडून सुमारे तीन कोटी किमतीची घड्याळे चोरून पळ काढला. सात ते आठ चोरटे दिसत आहेत. या घटनेनंतर शोरूम मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. शोरूम मालकाच्या तक्रारीनुसार चोरट्यांनी सुमारे 671 घड्याळे चोरून नेली. ट्विटरवर @vani_mehrotra या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement