Video- Waiter Slips On Floor Dies: फरशीवरुन घसरुन पडल्याने हॉटेल कर्मचाऱ्याचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
केवळ फरशीरुन घसरल्याने येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सांगिले जात आहे की, हा तरुण रेस्टॉरंटमधील कर्मचारी होता आणि तो ओल्या फरशीवरुन सामान हालवत होता.
घरातील ओल्या फरशीवरुन चालताना सावधान. इंदौर येथील एका रेस्टॉरंटमधून धक्कादाय घटनेचा व्हिडिओ पुढे आला आहे. केवळ फरशीरुन घसरल्याने येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सांगिले जात आहे की, हा तरुण रेस्टॉरंटमधील कर्मचारी होता आणि तो ओल्या फरशीवरुन सामान हालवत होता. अधिक माहिती अशी की, इंदूरमधील रेस्टॉरंटच्या मजल्यावर घसरून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. घसरुन पडल्यानंतर तो ओरडला नाही, की त्याने कोणतीही हालचाल केली नाही. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला उचलले तेव्हा तो बेशुद्ध पडला होता. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)