Sleeping Thief in Mathura Railway Station: रेल्वे प्रवासादरम्यान अनेकांचे फोन, मौल्यवान वस्तू आणि पाकिटं चोरीला गेल्याच्या तक्रारी आपण पाहिल्या असतील. मथूरा रेल्वे स्टेशन (Mathura station) वर अशाच एक चोराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. स्थानकातील पॅसेंजर वेटिंग रुममध्ये असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फूटेजच्या माध्यामातून त्याला पोलिसांनी पकडलं आहे.वेटिंग रुममध्ये काही प्रवासी जमिनीवरच झोपलेले असताना तो त्या व्यक्तींच्या बाजूला जाऊन झोपायचा आणि त्यांच्या खिशातील वस्तू चोरायचा. झोपेचं सोंग आणून चोरी करणाऱ्या या चोराने लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. रेल्वे पोलिसांनी या चोराला अटक केली आहे. अवनिश सिंह असं त्याचं नाव असून तो 21 वर्षांचा आहे. तो इथा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. आतापर्यंत त्याने अशाप्रकारे 5 मोबाईल चोरल्याची कबुली चोराने दिली आहे. (हेही वाचा :B Tech Laptop Thief in Bengaluru: बेंगलूरू मध्ये पीजी मधून लॅपटॉप्स चोरणारी 29 वर्षीय बीटेक तरूणी अटकेत )
रेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Videohttps://t.co/Fzppurm5u3 < येथे वाचा सविस्तर वृत्त...#SleepingThief #uttarpradeshnews #uttarpradesh #Mathura #CCTV #Railway #RailwayStation #IndianRailway pic.twitter.com/aFQWGO8gqV
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)