नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय झालं? पहा Deputy Commissioner of Police (DCP) Railway यांनी दिलेली माहिती

दिल्ली स्टेशन च्या चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीतील जखमींवर नजिकच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

Delhi Station | X @ANI

नवी दिल्ल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. Deputy Commissioner of Police (DCP) Railway, KPS Malhotra यांनी घटनेची माहिती देताना प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर प्रयागराज एक्सप्रेस लागली होती. अनेक लोक प्लॅटफॉर्म वर होती. सोबतच  Swatantrata Senani Express आणि Bhubaneshwar Rajdhani ला उशीर झाला होता. या ट्रेनचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म वर 12,13,14 वर दाखल होते. 1500 जनरल तिकीट्स विकली गेली आहेत. त्यामुळे गर्दी अनियत्रित झाली. प्लॅटफॉर्म 14 आणि 1 च्या एक्सलेटर जवळ चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती झाली. मात्र आता स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असताना डीसीपी केपीएस मल्होत्रा, इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यास मदत करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement