Kartikeya Sarabhai on Chandrayaan-3 Mission: विक्रम साराभाई यांचे सुपुत्र कार्तिकेय साराभाई यांची पहा चंद्रयान 3 बद्दल काय आहे प्रतिक्रिया!

इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावे आज लॅन्डर चंद्रावर उतरणार आहे.

Kartikeya Sarabhai | Twitter

चंद्रयान 3 चा लॅन्डर विक्रम आज चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. इस्त्रो साठी अत्यंत महत्त्वाची चंद्र मोहिम आहे. इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावे आज लॅन्डर चंद्रावर उतरणार आहे. भारतीय या क्षणासाठी प्रार्थना आणि सेलिब्रेशनची तयारी करत आहेत. या मोहिमेबद्दल विक्रम साराभाई यांचे सुपुत्र कार्तिकेय साराभाई यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या आता अचूक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आहे. चंद्रयानाचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या लॅब्स मध्ये बनले आहेत पण त्यांचे एकत्र प्रयत्न आज आपल्याला हा दिवस दाखवत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. चंद्रयान 2 वाया गेले नसून त्या चूकांमधून शिकून आपण हा तिसरा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement