RBI Monetory Policy- Repo Rate: रिझर्व्ह बँकेने मॉनेटरी पॉलिसी केली जारी, कर्ज स्वस्त होणार नाही, रेपो दरात बदल नाही
रिझर्व्ह बँकेने लोकांना ईएमआयवर आणखी दिलासा न देता व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
RBI ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आता EMI चा बोजा वाढणार नाही अशी आशा सर्वसामान्य लोकांना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीत जाहीर केले. म्हणजेच रेपो रेट (Repo Rate) आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फेब्रुवारीच्या बैठकीत आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने व्याजदरात २५ आधार अंकांची वाढ केली होती. यानंतर रेपो दर 6.25% वरून 6.50% झाला.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)