Rajasthan: बोअरवेलमधून बाहेर काढलेल्या 3 वर्षाच्या चेतनाचा मृत्यू; तब्बल 10 दिवस चालले होते बचावकार्य

राजस्थान एनडीआरएफचे प्रमुख योगेश मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तिला बाहेर काढले तेव्हा शरीरात काहीच हालचाल होत नव्हती. बचाव पथकाने बोअरवेलला समांतर बोगदा खोदून तिला बाहेर काढले.

3-Year-Old-Girl Pulled Out of Borewell After Rescue Operation (Photo Credits: X/PTI)

राजस्थानमधील कोटपुतली येथे 700 फूट खोल बोअरवेलमध्ये 10 दिवस अडकलेल्या चेतना या 3 वर्षीय मुलीला बुधवारी अखेर बाहेर काढण्यात आले, मात्र तिला वाचवता आले नाही. तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. चेतनाला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच तिची प्रकृती तपासता यावी म्हणून तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. राजस्थान एनडीआरएफचे प्रमुख योगेश मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तिला बाहेर काढले तेव्हा शरीरात काहीच हालचाल होत नव्हती. बचाव पथकाने बोअरवेलला समांतर बोगदा खोदून तिला बाहेर काढले. चेतनाला वाचवण्याचे हे ऑपरेशन राज्यातील सर्वात मोठ्या बचाव कार्यांपैकी एक होते. चेतना 23 डिसेंबर रोजी राजस्थानची राजधानी जयपूरला लागून असलेल्या कोटपुतली गावात बोअरवेलमध्ये पडली होती. या 700 फूट खोल खड्ड्यात 150 फुटांवर चेतना अडकली होती. तिला बाहेर काढण्याचे काम 10 दिवस सुरू होते. (हेही वाचा: Faridabad: शेकोटी पेटवून झोपलेल्या दोन सुरक्षारक्षकांचा गुदमरून मृत्यू, फरिदाबादमधील घटना)

बोअरवेलमधून बाहेर काढलेल्या 3 वर्षाच्या चेतनाचा मृत्यू-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now