Rahul Gandhi Official Residence: सरकारी बंगला परत मिळाल्यावर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले- 'संपूर्ण भारत माझे घर आहे' (Watch Video)
याआधी 23 मार्च रोजी गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले व त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर एका दिवसानंतर, म्हणजेच मंगळवारी (8 ऑगस्ट) त्यांना जुना सरकारी बंगला देण्यात आला आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने राहुल गांधी यांना 12 तुघलक लेन येथील बंगला परत दिला आहे. आपला बंगला परत मिळाल्यावर, 'संपूर्ण भारत माझे घर आहे,' अशी प्रतिक्रिया गांधी यांनी दिली आहे. मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (4 ऑगस्ट) राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले. आता त्यांना त्यांचा बंगलाही मिळाला आहे.
याआधी 23 मार्च रोजी गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले व त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली. मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी हायकोर्टात पोहोचले मात्र त्यांना येथे दिलासा मिळाला नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला. (हेही वाचा: केरळ विधानसभेमध्ये UCC विरोधात एकमताने ठराव मंजूर)
Rahul Gandhi Gets Back His Official Residence-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)