Nipah virus In Kerala: केरळ मध्ये निपाह च्या पार्श्वभूमीवर NIV Pune टीम सुरू करणार मोबाईल लॅब्स; वटवाघुळांचाही होणार सर्व्हे
कोझिकोड जिल्ह्यातील दोन केंद्रे आणि त्याच्या सभोवतालची पाच किमीचा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
केरळ मध्ये पुन्हा निपाह संसर्गाने डोकं वर काढलं आहे. 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासन अलर्ट मोड वर आलं आहे. आज संध्याकाळपर्यंत NIV Pune च्या टीम्स तेथे पोहचणार आहेत. एका टीम कडून मोबाईल लॅब्स उभारल्या जाणार आहेत तर दुसरी टीम वटवाघुळांचा सर्व्हे करण्यासाठी येणार आहे. Kerala Health Minister Veena George यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रोटोकॉलच्या आधारावर, 16 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये 75 खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. कोझिकोड जिल्ह्यातील दोन केंद्रे आणि त्याच्या सभोवतालची पाच किमीचा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)