नागपुरात मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट'; 29 जुलै रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून २९ जुलै २०२६ रोजी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Old Image/ For Representational Purpose

नागपूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या हवामान अंदाजानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर जिल्हा प्रशासनाने मंगळवार, २९ जुलै रोजी सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि प्रवासादरम्यान होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement