Mann Ki Baat 100th Episode Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक 100 व्या 'मन की बात' एपिसोडचं इथे ऐका थेट प्रक्षेपण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित होणार आहे. सर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदींकडून भारतातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष वेधले जाते. त्याबाबत जनतेला संदेश दिला जातो. दरम्यान मोदींच्या या कार्यक्रमांमध्ये अनेक उल्लेखनीय उपक्रमांचा देखील समावेश करण्यात आला होता. आज त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाचा 100 वा भाग जागतिक स्तरावर प्रसारित करण्यात येणार आहे. देशाच्या गल्लीबोळ्यापासून थेट यूएनच्या हेडक्वार्टर पर्यंत त्याचं प्रसारण होणार आहे. देशभर राजभवनात, लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या विभागांत ठिकठिकाणी या ऐतिहासिक कार्यक्रमाला ऐकण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. रेडिओ सोबतच डीडी चॅनल्स, युट्युब चॅनल्स वर देखील 'मन की बात' लाईव्ह ऐकता येणार आहे.
मन की बात 100 वा भाग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)