Delhi: वृद्ध महिलेच्या हातातून पर्स हिसकावून अवघ्या काही सेकंदात आरोपी फरार (Watch Video)

एका वृद्ध महिलेच्या हातातून हँडबॅग हिसकावून आरोपी अवघ्या काही सेकंदात फरार झाला आहे. यावेळी झटापटीत महिलेला दुखापत झाली आहे.

Man snatched handbag of an elderly woman (Photo Credits: ANI)

एका वृद्ध महिलेच्या हातातून पर्स हिसकावून आरोपी अवघ्या काही सेकंदात फरार झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात तुम्ही पाहू शकाल की, महिला चालत असताना अचानक मागून एक माणूस येतो आणि हातातील पर्स हिसकावतो. महिला विरोध करत असताना झालेल्या झटापटीत महिला खाली पडते. आरोपी फरार होतो. त्यानंतर ती महिला हळूहळू चालत घर गाठते. दरम्यान, या घटनेत महिलेला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 3 जुलै रोजी दिल्ली मधील सीआर पार्क परिसरातील महिलेच्या घराबाहेरीच घडली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement