Maha Kumbh Stampede: 'महाकुंभात घडलेली घटना मोठी नव्हती...'; मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीवर भाजप खासदार Hema Malini यांचे वादग्रस्त विधान (Video)
हेमा मालिनी म्हणाल्या, आम्हीही कुंभमेळ्याला गेलो होतो. आम्ही संगममध्ये स्नान केले. सगळीकडे चांगले व्यवस्थापन होते. इथे खूप लोक येत आहेत. एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे, मात्र आम्ही ते व्यवस्थित व्यवस्थापित करत आहोत.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला, तर 60 लोक जखमी झाले. आता या घटनेवर मथुरा येथील भाजप खासदार हेमा मालिनी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, की ही घटना जितकी अतिशयोक्तीपूर्ण दाखवली गेली, तितकी मोठी नव्हती. जसे दाखवण्यात आले तसे मोठे काही झाले नव्हते. हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, आम्हीही कुंभमेळ्याला गेलो होतो. आम्ही संगममध्ये स्नान केले. सगळीकडे चांगले व्यवस्थापन होते. इथे खूप लोक येत आहेत. एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे, मात्र आम्ही ते व्यवस्थित व्यवस्थापित करत आहोत. इथली व्यवस्था इतकी चांगली आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाकुंभला भेट देणार आहेत. महत्वाचे म्हणजे, चेंगराचेंगरीच्या दिवशी हेमा मालिनी यांनीही संगमात स्नान केले होते.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल संसदेत प्रश्न उपस्थित केल्याच्या प्रश्नावर हेमा मालिनी म्हणाल्या की, अखिलेश यांचे काम चुकीच्या गोष्टी बोलणे आहे. घटना घडली खरी, पण ती इतकी मोठी घटना नव्हती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाकुंभातील मृतांच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले होते.
Hema Malini on Maha Kumbh Stampede:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)