Kota: राजस्थानच्या कोटामध्ये 3 कोचिंग विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; दोघे एकाच वसतिगृहात राहत होते

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यांपैकी दोन बिहार आणि एक मध्य प्रदेशातील आहे. या तिघांचे वय 16, 17 आणि 18 वर्षे होते.

Kota: राजस्थानच्या कोटामध्ये 3 कोचिंग विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; दोघे एकाच वसतिगृहात राहत होते
Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

राजस्थानमधील कोटा येथे कोचिंगमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यांपैकी दोन बिहार आणि एक मध्य प्रदेशातील आहे. या तिघांचे वय 16, 17 आणि 18 वर्षे होते. मृत विद्यार्थ्यांमध्ये अंकुश आणि उज्ज्वल हे दोघेही बिहारचे विद्यार्थी एकाच वसतिगृहात राहत होते. एक इंजिनीअरिंगची  तर दुसरा मेडिकलची तयारी करत होता. प्रणव हा मध्य प्रदेशचा विद्यार्थी NEET ची तयारी करत होता. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परीक्षांच्या तयारीसाठी कोटा देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडच्या काळात येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2022 09:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).