Horrific Road Accident: विजयवाडाहून चेन्नईला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, तर 10 प्रवासी गंभीर जखमी

महामार्गावर बस उलटल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. सध्या पोलीस बस महामार्गावरून हटविण्याचे काम करत आहेत.

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला असून 10 प्रवासी जखमी झाले आहेत. बस कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर बस उलटली. हा अपघात नेल्लोर जिल्ह्यातील दगडरथी मंडलातील सुन्नापुबत्तीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झाला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावर बस उलटल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. सध्या पोलीस बस महामार्गावरून हटविण्याचे काम करत आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement