Ghulam Nabi Azad On Kashmiri Pandit: कश्मीरी पंडितांना जम्मूला पाठवलं पाहिजे, गुलाम नबी आझादांचं कश्मीरी पंडितांच्या वास्तव्यावर मोठं विधान
त्याच पार्श्वभुमिवर पडितांना जम्मूला पाठवले पाहिजे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर ते आपल्या मुळ ठिकाणी परत येवू शकतात, असं वक्तव्य गुलामनबी आझाद यांनी केलं आहे.
कॉंग्रेसपक्षाला रामराम ठोकल्या नंतर जम्मुकाश्मिर मधूनचं गुलामनबी आझाद आपल्या नव्या पक्षाची मोर्चेबांधणी करीत आहेत. दरम्यान आझाड यांनी कश्मिरी पंडितांच्या वास्तव्याबाबत मोठं विधान केलं आहे. नेते गुलामनबी आझाद म्हणाले, माझ्या कार्यकाळात कश्मिरी पंडितांना कुठलाही त्रास झाला नाही, मी कश्मिरी पंडितांना नोकऱ्या दिल्या पण त्यानंतर मात्र पंडितांसोबत जे काही घडलं ते दुर्दैव होतं. म्हणून आता सर्वप्रथम कश्मिरी पंडितांची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. त्याच पार्श्वभुमिवर पडितांना जम्मूला पाठवले पाहिजे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर ते आपल्या मुळ ठिकाणी परत येवू शकतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)