G20 Summit in Delhi: राजधानी दिल्लीत जी-20 फिव्हर, पॅरामेडिकल अधिकाऱ्यांना 3 शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश
या बैठकीत डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ निवासी डॉक्टर्स सहभागी झाले होते.
दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली सचिवालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी वैद्यकीय व्यवस्थेबाबत चर्चा केली. G20 शिखर परिषदेसाठी परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांच्या आरोग्य व्यवस्थेत तैनात सर्व हजर होते. या बैठकीत डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ निवासी डॉक्टर्स सहभागी झाले होते.
सर्वांना संबोधित करताना मंत्री सौरव भारद्वाज म्हणाले की, यावेळी भारताला G20 शिखर परिषदेची जबाबदारी मिळाली आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत G20 परिषद होणार आहे. त्यामुळे इतर सर्व सरकारांच्या तुलनेत दिल्ली सरकारची ही परिषद यशस्वी करण्याची जबाबदारी अधिक आहे.
पाहा ्ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)