Kuno National Park मध्ये आठव्या चित्त्याचा मृत्यू; आठवडाभरातील दुसरी घटना
नरेंद्र मोदी यांच्या बर्थ डेचं औचित्य साधत या चित्त्यांना भारतामध्ये आणले होते आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेतून भारतातील मध्य प्रदेशात सोडण्यात आले होते.
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये चित्त्यांमधील अजून एकाचा मृत्यू झाला आहे. आज (14 जुलै) अजून एक म्हणके आठव्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच 'दक्ष' चित्त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान 27 मार्चला नामीबियाई मध्ये आणलेल्या पहिल्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. त्याला किडनीचा आजार झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मागील महिने सातत्याने होणारे हे मृत्यू चिंतेचा विषय बनले आहेत. फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेहून 12 चित्ते आणण्यात आले. यामध्ये 7 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांनादेखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. नक्की वाचा: Supreme Court On Cheetah Death: कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, इतर अभयारण्यात बंदोबस्त करण्याचा दिला सल्ला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)