Earthquake in UP: सोनभद्र, यूपीमध्ये तीव्र उष्णतेमध्ये 3.9 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

दुपारी 3:49 वाजता अचानक जमीन हादरायला लागली. यानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पळू लागले.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये कडाक्याच्या उन्हात भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता 3.9 इतकी मोजली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, लोक आपापल्या घरात बसले होते. दरम्यान, दुपारी 3:49 वाजता अचानक जमीन हादरायला लागली. यानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पळू लागले. ही दिलासा देणारी बाब आहे की, आतापर्यंत कुठलीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र लोकांच्या चेहऱ्यावर भूकंपाची भीती स्पष्टपणे दिसत आहे. भूकंपामुळे लोक अजूनही घाबरलेले आणि चिंतेत आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement