Social Media Account Hacked: कॅनरा बँकेचे सोशल मीडिया खाते हॅक!
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेचे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंट हॅक करण्यात आले आहे. बँकेच्या सोशल मीडिया खात्याचे वापरकर्तानाव हॅकरने बदलून 'एथरडॉटफी' असे केले आहे. सध्या बँकेने याबाबत कार्यवाही केलेली नाही. हॅक झाल्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत खात्यावर कोणत्याही प्रकारची नवीन पोस्ट करण्यात आली नव्हती.
Social Media Account Hacked: देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेचे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंट हॅक करण्यात आले आहे. बँकेच्या सोशल मीडिया खात्याचे वापरकर्तानाव हॅकरने बदलून 'एथरडॉटफी' असे केले आहे. सध्या बँकेने याबाबत कार्यवाही केलेली नाही. हॅक झाल्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत खात्यावर कोणत्याही प्रकारची नवीन पोस्ट करण्यात आली नव्हती. असाच सायबर हल्ला 17 जूनच्या रात्री ॲक्सिस बँकेवर झाला होता. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ॲक्सिस बँकेचे सपोर्ट खाते हॅक करण्यात आले. यावेळी हॅकर्सकडून अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीबाबत काही पोस्ट करण्यात आल्या होत्या.
क्सिस बँकेने 18 जूनच्या पोस्टमध्ये लिहिले होते, आम्ही ॲक्सिस बँकेच्या सपोर्ट हँडलच्या संभाव्य हॅकची चौकशी करत आहोत. ते लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृपया या कालावधीत केलेल्या सर्व पोस्ट्सकडे दुर्लक्ष करा आणि कोणताही अनधिकृत वापर करू नका. लिंकवर क्लिक करू नका.ॲक्सिस बँकेने पुढील पोस्टमध्ये म्हटले होते, बँक आपल्या ग्राहकांकडून इंटरनेट बँकिंग आणि फोन बँकिंग पासवर्ड, ओटीपी, पिन, ईमेल, फोन नंबर आणि इतर कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)