Rajya Sabha Election BJP Candidates List: भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी केली जाहीर, उत्तर प्रदेशमधून 7 उमेदवारांची घोषणा

भाजपने यूपीमधून सात आणि उत्तराखंडमधून एका उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत.

BJP | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने 14 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने यूपीमधून सात आणि उत्तराखंडमधून एका उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत. यूपीमधून भाजपने घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये आरपीएन सिंग, डॉ. सुधांशू त्रिवेदी, चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंग, अमरपाल मौर्य, डॉ. संगीता बलवंत आणि नवीन जैन यांचा समावेश आहे. तर भाजपने महेंद्र भट्ट यांना उत्तराखंडमधून उमेदवारी दिली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)