Bengaluru Baiyappanahalli Metro Station: बेंगळुरू मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी वाचवला रुळावर पडलेल्या मुलाचा जीव,बैयप्पनहल्ली स्टेशनची घटना
1 ऑगस्ट रोजी रात्री 9.08 वाजता बहिणीसोबत खेळत असलेला मुलगा रेल्वे रुळावर पडला.
Bengaluru Baiyappanahalli Metro Station: गुरुवारी रात्री बेंगळुरूच्या बैयप्पनहल्ली मेट्रो स्थानकावर एका चार वर्षांच्या मुलाचा बचाव झाला. 1 ऑगस्ट रोजी रात्री 9.08 वाजता बहिणीसोबत खेळत असलेला मुलगा रेल्वे रुळावर पडला. मेट्रो अधिकाऱ्यांनी तात्काळ वीजपुरवठा खंडित केला आणि ट्रेन चालकांना त्यांच्या गाड्या थांबविण्याचे निर्देश दिले.बेंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) ने संभाव्य आपत्ती टाळल्याबद्दल त्याच्या सतर्क कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. एका ट्विटमध्ये बीएमआरसीएलने म्हटले आहे की, "आमच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी मुलाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तत्परतेने कार्य केले, त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होण्या पासून टळली. हेही वाचा: Farmer Denied Entry to Bengaluru Metro: अस्वच्छ कपड्यांमुळे शेतकऱ्याला बेंगळुरू मेट्रोमध्ये प्रवेश नाकारला; सुरक्षा कर्मचारी बडतर्फ, BMRCL ने जारी केले स्पष्टीकरण (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)