Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony Live Streaming: अयोद्धेच्या श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
आज दुपारी भारतीय वेळेनुसार, 12.30 ते 1 या दरम्यान (मृगशीर्ष नक्षत्रावर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा पूजा होणार आहे.
अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये आज 5 दशकाच्या प्रतिक्षेनंतर भगवान श्रीराम यांचे आगमन होणार आहे. हिंदू धर्मीयांसाठी आजचा हा दिवस कोणत्याही सणा इतका कमी नाही. आज आयोद्धेमध्ये हा सोहळा प्रत्यक्ष जाऊन पाहणं अनेकांना शक्य नाही परंतू लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून अवघ्या जगभरातून रामभक्त हा क्षण पाहू शकणार आहे. आज दुपारी भारतीय वेळेनुसार, 12.30 ते 1 या दरम्यान (मृगशीर्ष नक्षत्रावर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यामध्ये प्राणप्रतिष्ठेचा विधी मूहूर्त मुहूर्त दुपारी १२ वाजून २९ मिनिटे व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंद पर्यंत आहे. Ayodhya Ram Mandir Visuals: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी भाविकांची अलोट गर्दी, पाहा व्हिडिओ .
पहा अयोद्धेच्या राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठा सोहळा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)