Amravati : अमरावतीत दूषित पाणी प्यायल्याने तिघांचा मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 5 लाखांच्या मदतीची घोषणा

अमरावतीत मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्यामुळे 3 जणांना जीव गमवाला.या तिघांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: ANI)

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाट (Melghat) परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील प्यायल्याने 50 जणांची प्रकृती खराब झाली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. या तिघांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. तसेच आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement