Amarnath Cloud Burst : अमरनाथ गुहेच्या खालच्या भागात ढगफूटी, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर रवाना

अमरनाथ (Amarnath) गुहेच्या खालच्या भागात ढगफुटी झाली आहे. एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Amarnath Yatra | File Photo, Photo Credits: PTI)

अमरनाथ (Amarnath) गुहेच्या खालच्या भागात आज संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान  ढगफुटी झाली आहे. वरच्या भागात मुसळधार पाऊस झाल्याने गुहेच्या खालच्या भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. ढगफूटीचा अमरनाथ धामच्या काही लंगरवर परिणाम झाला आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेतील जखमींना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now