Delhi Fire News: दिल्लीतील बवाना येथील एका कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल
या आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील बवाना (Bawana) भागात शनिवारी एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीच्या घटनेनंतर कारखाना व परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या आगीच्या घटनेबाबत दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, एकूण 20 अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले होते. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तीन मजली कारखान्याच्या वरच्या दोन मजल्यावर ही आग लागली. हा कारखाना बवाना सेक्टर 5 मध्ये आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सातत्याने प्रयत्न करत आहेत.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | A massive fire broke out in a factory in Bawana industrial area of Delhi today. 20 fire tenders rushed to the site. No injuries or casualties reported. Details awaited. pic.twitter.com/xDq1crdieA
— ANI (@ANI) November 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2023 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

