Earthquake: नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी हरियाणात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप तर राजधानी दिल्लीतही भूकंपाचे हादरे
मध्य रात्री १ च्या सुमारास हरियाणातील झज्जर भागात ३.८ रिश्टर स्केलचे सौम्य भुकंपाचे जाणवले. एवढचं नाही तर राजधानी दिल्लीच्या काही भागात देखील या भुकंपाच्या धक्क्याचे हादरे जाणवले.
संपूर्ण देश नव्या वर्षाच्या पहिल्याचं रात्री मोठ्या उत्सहात नवीन वर्षाचं स्वागत करत होता. पण या आनंदास विर्जन पडावं अशीच बातमी हरियाणातून पुढे आली आहे. मध्य रात्री १ च्या सुमारास हरियाणातील झज्जर भागात ३.८ रिश्टर स्केलचे सौम्य भुकंपाचे जाणवले. एवढचं नाही तर राजधानी दिल्लीच्या काही भागात देखील या भुकंपाच्या धक्क्याचे हादरे जाणवले. तर या भुकंपाच्या धक्क्यामुळे वर्षाच्या पहिल्याचं दिवशी नागरिकांनमध्ये भितीचं वातावरण दिसून आलं. तरी या भुकंपात कुठलीही वित्तहानी किंवा जिवीत हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)