Manipur Violence: मणीपूर हिंसाचारादरम्यान समाजकंटकांनी फुटबॉलपटू चिंगलेनसाना सिंग याचे घर जाळले
मे महिन्यापासून दोन समुदायांमध्ये सुरू झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण मणिपूर जळत आहे.
मणिपूर हिंसाचाराने संपूर्ण देश हादरला आहे. या हिंसाचाराने भारतीय फुटबॉलपटूही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. भारतीय फुटबॉलपटू चिंगलेनसाना सिंग कोझिकोडेची आतापर्यंतची कमाई राख झाली आहे. त्याच्या घराला आग लावण्यात आली आहे. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मेहनत घेऊन तयार करण्यात आलेला हा टर्फही जळून खाक झाला आहे. त्याचे कुटुंब हिंसेतून थोडक्यात बचावले, सध्या एका मदत केंद्रात त्याचे कुटुंब राहत आहे. मे महिन्यापासून दोन समुदायांमध्ये सुरू झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण मणिपूर जळत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)